भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूर्य असे गगनीं । परी दिसतो जीवनीं

surya ase gaganin | pari disato jivanin

रचनाकार: संत नरहरी · अभंग
सूर्य असे गगनीं । परी दिसतो जीवनीं ॥ १ ॥ मेघ असतो अंबरीं । पाणी पडे भूमीवरी ॥ २ ॥ आकाशीं चंद्र तारांगण । बिंब दिसे पाण्यांतून ॥ ३ ॥ बिंब पाहतां दर्पणीं । बिंबे दिसे त्यांतुनी ॥ ४ ॥ आत्मा अनुभवीं पाहतां । देव दिसे हो तत्वतां ॥ ५ ॥ गुरु कृपा होय पूर्ण । नरहरी लंपट निशिदिन ॥ ६ ॥