भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्य ज्योतिलिंग बारा । प्रातःकाळीं स्मरण करा । कोटि कुळें उद्धारा । भव तरा बापहो

satya jyotiling bara | pratahkalin smaran kara | koti kulen uddhara | bhav tara bapaho

रचनाकार: संत नरहरी · अभंग
सत्य ज्योतिलिंग बारा । प्रातःकाळीं स्मरण करा । कोटि कुळें उद्धारा । भव तरा बापहो ॥ १ ॥ वाराणसी विश्वनाथ । मोक्षदाता तो समर्थ । पुरवील अंतरीचें आर्त सोमनाथ । सोरटी ॥ २ ॥ ॐकार ममलेश्वर । सेतबंध रामेश्वर । भीम उगमीं भीमाशंकर । घृणेश्वर वेराळीं ॥ ३ ॥ नागनाथ अमृतोदकीं । विश्वजन केलें सुखी । परळी वैजनाथ सुखी । सुकृत साचें जन्माचें ॥ ४ ॥ त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवील अंतरीचें काज । त्याही तेजामाजीं तेज । महाकाळ उज्जनी ॥ ५ ॥ दुजे कैलास भुवन । श्रीशैल्य मल्लकार्जुन । वाचे स्मरतां धन्य धन्य । अनुपम्य क्षेत्र तें ॥ ६ ॥ ब्रद्रिकेदार उत्तरें । ज्याचें स्मरणें भव हा तरे । ध्यान धरितां वृत्ति नुरे । निज निश्चळ दासाची ॥ ७ ॥