भजनी मालिका

संत गोणाई

या संतांची भजने

राही रखुमाई सत्यभामा माता सिकवा वो कांता बहुतां परी।।१।। संत सनकादिक साक्ष हे सकळ । येणें माझें बाळ चाळविलें ॥२॥

रचनाकार: संत गोणाई

लावोनि भवभयें तुवां केलें साचें। देह नव्हे याचें ऐसें केलें ॥१॥ सुखभोग सर्व दिला टाकोनियां नेणें तुझ्या पायांपरतें कांहीं ॥ २॥

रचनाकार: संत गोणाई

वडील वडील आमुची बोलतील गोष्टी परी तुज ऐसा सुटी देव नाहीं।।१।। दर्शना आलिया पाडिसी आव्हाटा मन मारूनी चोहाटा भुलविसी तूं ||२||

रचनाकार: संत गोणाई

विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ।।१।। दर्शना आलिया हृदयीं संचरसी। देहभाव घेसी हिरोनियां ।।२।।

रचनाकार: संत गोणाई

हरी त्वां कोणाचें बरवें केलें । पूर्ण आम्हां कळों आलें ।।१।। नारद वैष्णव जगजेठी। त्यासी लाविली लंगोटी ।।२।।

रचनाकार: संत गोणाई