भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकुमार हरीची पाउलें । सुंदर हरीचीं पाउलें

sukumar harichi paulen | sundar harichin paulen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सुकुमार हरीची पाउलें । सुंदर हरीचीं पाउलें ॥१॥ भीमातटीं देखिलें । वोळलें तें पुंडलिका ॥२॥ शेषशयनीं जी पाउलें । लक्ष्मीकरीं तीं पाउलें ॥३॥ गरुडपृष्ठी जी पाउलें । बळीयागीं तीं पाउलें ॥४॥ विटेवरीं जी पाउलें । एका जनार्दनीं तीं पाउलें ॥५॥