भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रवणें कीर्तनें जाले ते पावन

shravanen kirtanen jale te pavan

श्रवणें कीर्तनें जाले ते पावन । सनकादिक जाण परम भक्त ॥१॥ जाली ते विश्रांति याचकां सकळां । जीवीं जीवनकळा श्रीमूर्तिरया ॥२॥ पादसेवनें आक्रूर जाला ब्रम्हरुप । प्रत्यक्ष स्वरुप गोविंदाचें ॥३॥ सख्यपणें अर्जुन नरनारायणीं । सृष्टि जनार्दनीं एकरुप ॥४॥ दास्यत्त्व निकट हनुमंते केलें । म्हणोनि देखिले रामचरण ॥५॥ बळि आणि भीष्म प्रल्हाद नारद । बिभीषणावरद चंद्रार्क ॥६॥ व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । आणिक पुंडलिकादि शिरोमणी ॥७॥ शुकादिक योगी रंगले श्रीरंगी । परिक्षितीचा अंगीं ठसावलें ॥८॥ उध्दव यादव आणि ते गोपाळ । गोपिकांचा मेळ ब्रम्हरुप ॥९॥ अनंत भक्त राशी तरले ते वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदीं ॥१०