भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु उतावीळ भक्तीचिया काजा

bahu utavil bhaktichiya kaja

बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥१॥ तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । म्हणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥ ॠषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥२॥ नाहीं नास तें सुख दिलें तयांस । जाले जे उदास सर्वभावें ॥३॥ तुका म्हणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेंसी पाय तुझे ॥४॥