भजनी मालिका

भजने

उपजोनी सभाग्य तेचि एक जाले । जीहीं विचारिलें आत्महित ॥१॥ सांडोनि मीपणास सद्‌‍गुरुचरणा । लागलों संपूर्ण भावार्थोंसि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उपदेश अगोचर उपदेशी अगोचर मदलसा पुत्रालागीं रहीवासु । ध्यानरुप येक करी सर्वाघटीं महेशु ।

उपदेश उपरति ज्ञान ध्यानएकनिष्ठ । विज्ञान तें आटलेंरे दृश्यादृश्य तेथे दृष्ट । आदिअंत हरपला सर्व ब्रम्ह एक वाट । नित्य नेम चालतारे होय वैकुंठ ॥१॥ जे जो जे जो निजानंदे आत्माराम प्रसिध्द । उपदेश ऐसें बाळा मदालसा प्रबोध । उपजोनि संसारीरे एकतत्त्व तेंचि सिध्द ॥

उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥ शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उपदेश विव्हळ न कळे याचा अर्थ । वायांची हा स्वार्थ प्रपंचाचा ॥१॥ सांडी हा प्रपंच मिथ्या लवलाहो । विठठल हा टाहो नित्य करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उपमन्यु प्रल्हादु तारिलें आळीकें । मी तुझें लाडकें सानपणें ॥१॥ नेणतीयांसी धांवसी तुं त्वरा । शाहणे वेरझारा मरताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उपमन्यु बाळा स्थापी क्षीरसिंधु । अनाथाचा बंधु नाराणा ॥१॥ तुझें नाम मुखीं जपे सर्वकाळ । दिधलें अढळपद त्यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उपमन्यु सान देवासी कळवळ । क्षीरसिंधु तात्काळ दिला त्यासी ॥१॥ सानपणें अर्जुनें साधियेलें काज । श्रीकृष्ण निजगूज सांगतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरुपीं विलया मन गेलें ॥१॥ ऐशिया स्वानंदे बुझाविलें चित्त । राहिली अचिंत वदनीं वाचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उपवर ती कांता जाहली असे जाण । गोर्‍याची वासना नाहीं कामीं ॥१॥ विठोबाची आण घालोनि निरविलें । उभयतां ते वहिलें पाळा तुम्ही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ