भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपमन्यु बाळा स्थापी क्षीरसिंधु । अनाथाचा बंधु नाराणा

upamanyu bala sthapi kshirasindhu | anathacha bandhu narana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उपमन्यु बाळा स्थापी क्षीरसिंधु । अनाथाचा बंधु नाराणा ॥१॥ तुझें नाम मुखीं जपे सर्वकाळ । दिधलें अढळपद त्यासी ॥२॥ अनेक वृत्तांत काय सांगों देवा । अन्याय केशवा कोण मानी ॥३॥ नामा ह्मणे तैसें मी नाहीं मागत । ऐकोनियां मात आलों जन्मा ॥४॥