भजनी मालिका

भजने

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलाविल्यावांचूनि आला । उभा पाठीसी ठाकला । अवचित पुंडलिकें देखिला । मग पुजिला उपचारीं ॥१॥ म्हणे आजी हें नवल झालें । मज अनाथा सांभाळिलें । ब्रीद आपुलें साच केलें । सुयाणें घडलें स्वामीचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बोलावूं पाठवूं एवढी कैंची शक्ति । या रंग श्रीपती त्वां बा यावें ॥१॥ येईं गा विठ्ठला पाहातसें आतां । या रंगा अनंता त्वां बा यावें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बोलावें तें आम्ही आतां अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥१॥ मेघदृष्टि कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलावे म्हणून बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥१॥ भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलिजे तें नव्हें । बोलणें तेंही ती आहे । बोला आंतु बाहेर पाहे । पाहतां कवण आहे ॥१॥ हरि हरि हरि हरि । अहं सोहं नुरेचि उरी । आत्मा एक चराचरी । एकपण नाही निर्धारीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥ कवतुक तुझें नवल यापरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥ बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलिलें वेदांतीं ऐकिलें सिद्धांतीं । बोल नेति नेति अनिर्वाच्य ॥१॥ तोचि हा बोल बोलरे मना । बोल नारा -यणा समर्पावे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥ करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥ जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आम्ही करूं कोठें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम