भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलावूनी अवघींयातें । कंस पाहे विचारातें

bolavuni avaghinyaten | kans pahe vicharaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बोलावूनी अवघींयातें । कंस पाहे विचारातें ॥१॥ कोणीएक रे बोलती । आह्मां ठावी देववस्ती ॥२॥ जेथें पुराण कीर्तन गाईब्राह्मण करिती यज्ञ ॥३॥ तेथें असे नारायण । वधूं तयासी जाऊन ॥४॥ वैरी सहजची मरेल । ऐसे बोलताती बोल ॥५॥ कंसा मानवलें जाण । करा मजसाठीं यत्न ॥६॥ नामयाच्या छंदें । नंद करितो आनंद ॥७॥