भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि

bolaven ten dharma mile | bare dole ughaduni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥ काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥ दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥ तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥