भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका

bolilen chi bolen padapadataluni | upajat manin nahin shanka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥ बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥ बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥२॥ तुका म्हणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वांयां॥३॥