भजनी मालिका

भजने

देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥ पर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि झाले ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥ तया बरें फावे देवा चुकवितां । संचिलाची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देव तोचि भक्त नाहीं वेगळीक । जल गार उदक जयापरि ॥१॥ येरयेरामाजिं येकपणीं भिन्न । करुनि सौजन्य भोगिताती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देव त्यां फावला भाविका गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥ नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफार ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा ॥१॥ खरेपणा नाहीं देवाचे ते ठायीं । भक्त अभाविक पाहीं दोन्हीं एक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव दयानिधि भक्तांचा कैवारी । नाममात्रें तारी सर्वांलागीं ॥१॥ तया देवराया गावें हो आवडी । लागे मनीं गोडी सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव दाखवी असा नाहीं गुरु । जेथें जाय तेथें दगड शेंदुरु ॥१॥ देव दगडाचा बोलेल कैंचा । कोणे काळीं त्यास फुटेल वाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव देव म्हणोनि फिरताती वेडे । चित्त शुद्ध नाहीं तंव देव केवीं जोडे ॥१॥ पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला आहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ