भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव दाखवी असा नाहीं गुरु । जेथें जाय तेथें दगड शेंदुरु

dev dakhavi asa nahin guru | jethen jay tethen dagad shenduru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव दाखवी असा नाहीं गुरु । जेथें जाय तेथें दगड शेंदुरु ॥१॥ देव दगडाचा बोलेल कैंचा । कोणे काळीं त्यास फुटेल वाचा ॥२॥ देव देव करितां शिणलें माझें मन । जेथें जाय तेथें पूजा पाषाण ॥३॥ नांमा तोचि देव ह्लदयीम पाहे । नामा केशवाचे न सोडी पाय ॥४॥