भजनी मालिका

भजने

उंच निंच कैसी पाईकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥ स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उंच नीच नाहीं नामाचियां पुढें जातीचें तें गाढें नाहीं काम ॥१॥ अनामिकाहुनी असोत चांडाळ । परी नामाचा उच्चार मुखीं वसो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उचित अनुचित आम्ही नेणों नेणतीं । सर्वोविशीं मूढचि मती विदीत असावें ॥१॥ म्हणोनियां आतां कृपादृष्टी अवलोका । वैकुंठनायका नका उपेक्षा करुं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥१॥ न घालावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥ देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥ आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥ नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥१॥ वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उचितानुचिता भजे पंढरीनाथा । न बोलें सर्वथा वर्गें तुझीं ॥१॥ बिभिषणा तुवां दिधली नगरी । कीर्ति चराचरीं वाखा णिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उच्चार नामाचा करी पां साचार । आळस निर्धारें टाकून देई ॥१॥ तें नाम सोपें निवृत्तीचें जाणा । कायावाचा मना जप करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल । नाहीं कांही मोल द्रव्य वेंचे ॥१॥ जागृती सुषुप्ती स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानी । गाऊं तें कीर्तनीं दिननिशीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ