भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें

uchit na kale indriyache odhi | mukhen badabadi shikalen ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥ आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥ अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाटीं ॥२॥ तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥३॥