भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचलिला कमळापती । पायींचीं बंधनें गळती

uchalila kamalapati | payinchin bandhanen galati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उचलिला कमळापती । पायींचीं बंधनें गळती ॥१॥ त्रै-लोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥ कवाडें उघडती । देखतांची देवाप्रती ॥३॥ मंद मंद पडे पाऊस । शिरीं छाया करी शेष ॥४॥ पूर चढला अचाट । त्यासी लविला अंगुष्ट ॥५॥ त्वरें आला नंदाघरीं । निद्रिस्थ त्या नरनारी ॥६॥ ठेवी तेथें कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥७॥ रडे माया करी आक्रांत । नामा ह्मणे उठवी दूत ॥८॥