भजनी मालिका

भजने

आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आधीं चैतन्य अपैतें करोनी । मग संचरे तारुण्य वनीं । कामक्रोध तुज देखोनी । जाती पळोनी बारा वाटा ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

आधीं नाही कळो आला हा उपाय । नाही तरी काय चुकी होती ॥१॥ घालितो पाया सी मिठी एकसरे। नेदी तो दुसरे आड येऊं ॥ध्रु॥

रचनाकार: संत तुकाराम

आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं ॥१॥ ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम