भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधींच अविश्वासी जन । म्हणती कैंचा नारायण

adhinch avishvasi jan | mhanati kaincha narayan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आधींच अविश्वासी जन । म्हणती कैंचा नारायण ॥१॥ कोण तारिले या काळें । लटिकीं बोलती पाल्हाळें ॥२॥ लटिके संत लटिका देव । लटिकेंचि पापपुण्य सर्व ॥३॥ निळा म्हणे आमुच्या त्यागें । तुम्हांसी निंदिजेल जगें ॥४॥