भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं शुद्ध करा भाव । पाठीं पहा मग देव

adhin shuddha kara bhav | pathin paha mag dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आधीं शुद्ध करा भाव । पाठीं पहा मग देव ॥१॥ नका पडुं वायां भरी । चित्त नागवें निर्धारीं ॥२॥ भाव जाहलिया शुद्ध तत्त्वतां । मग देव होय प्राप्ता ॥३॥ एका जनार्दनीं देव । जेथेम जाय तेथें आहे ॥४॥