भजनी मालिका

भजने

नाम गाये तो सर्वत्र क्षितीं । नामें उद्धार त्रिजगतीं ॥१॥ ज्यांचे उच्चारितां नाम । निवारे क्रोध आणि काम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम घेतां रुप आठवलें सांवळें । हीं खुण गोपाळें दिली मज ॥१॥ येणें जन्में कृष्ण दाटोनी टाकणें । आडवस्ती पेणें चुकविली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम जनार्दन रुप जनार्दन । ध्यान जनार्दन सर्व मज ॥१॥ माय जनार्दन बाप जनार्दन । जन जनार्दन सर्व मज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम जनार्दन वाचे । भय नाहीं कळिकाळाचें । सार्थक जन्माचे । नाम गातां निश्चयें ॥१॥ सोपा मंत्र जनार्दन । जग व्यापक परिपुर्ण । जन वन जनार्दन । एका रुप नाम घेतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम जप वाचा प्रद्युम्न साचा । न करी नामाचा आळस कदा ॥१॥ संसारयातना जाती पां निर्धारें । नाम निरंतर जपें आधीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम तारक ये मेदिनी । नाम सर्वांचे मुगुटमणी । नाम जपे शुळपाणी । अहोरात्र सर्वदा ॥१॥ तें हें सुलभ सोपारें । कामक्रोध येणें सरे । मोह मद मत्सर । नुरे नाममात्रें त्रिजगतीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम तारक हें श्रीहरी । गर्जतां तुमचे भव सागरी ॥१॥ ऐसें जाणोन वैष्णवजन । करिती नित्यनित्य कीर्तन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाम तूं अधोक्षज घेई सर्वकाळ । महाकाळ काळ अधोक्षज ॥१॥ नामीं धरुनी प्रीति आठव सर्वदा । नाहीं तुज बाधा जन्मोजन्मीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ