भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम जींही उच्चारण केलें । तींही वैकुंठ साधिलें

nam jinhi uchcharan kelen | tinhi vaikunth sadhilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम जींही उच्चारण केलें । तींही वैकुंठ साधिलें । भवसागर पार पावले । उद्धरले हरिभक्त ॥१॥ नाम दुर्लभ दुर्लभ । तारील हा पद्मनाभ । पुंदलिकें करोनियां स्वयंभ । केशव मूर्ति केली उभी ॥२॥ ऐसें अगाध हरी रुपडें । प्रत्यक्ष पुंडलिकापुढें । भक्ती काज कैवाडें । भीमातरीं उभा असे ॥३॥ वर्णावया न पुरे शेष । वेदां न घालवे कास । तेथें शास्त्र काय घेती भाष । रुप वर्णावया हरीचें ॥४॥ उद्धव अक्रूर द्वापारीं । त्यासवें खेळले हरी । मग ते उद्धरिले अवधारी । ज्ञान देऊनि श्रीकृष्णें ॥५॥ नामा म्हणे ऐसें नाम । हरिकथेसी धरी प्रेम । तरी तुझा धन्य जन्म । मनुष्य जन्मीं असतां ॥६॥