भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तूं अधोक्षज घेई सर्वकाळ । महाकाळ काळ अधोक्षज

nam tun adhokshaj ghei sarvakal | mahakal kal adhokshaj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम तूं अधोक्षज घेई सर्वकाळ । महाकाळ काळ अधोक्षज ॥१॥ नामीं धरुनी प्रीति आठव सर्वदा । नाहीं तुज बाधा जन्मोजन्मीं ॥२॥ जनार्दनाचा एका प्रेमें विनटला । आपुलासा केला जनार्दन ॥३॥