भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम गोड श्रीरामांचें । अमृत फिकें जाहले साचें

nam god shriramanchen | amrut phiken jahale sachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम गोड श्रीरामांचें । अमृत फिकें जाहले साचें ॥१॥ हो कां उत्तम चांडळ । अधम खळांहुनी खळ ॥२॥ रामनाम वदतां वाचे । पवित्रपणें तोचि साचें ॥३॥ एका जनार्दनीं नाम । मुक्ति सायुज्य निष्काम ॥४॥