भजनी मालिका

भजने

न पडे विसर याचा मना । झाली तद्रुप वासना । मही व्यापूनियां गगना । दिसे नयना रुप पुढें ॥१॥ जें जें आढळें दृष्टीपुढें । तें तें याच्या स्वरुपें मांडें । व्यापुनी सकळांमाजिवडें । वसें अंतरीं सकळांचे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

न पढावे वेद नको शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥१॥ नव्हे ब्रह्मज्ञान न होय वैराग्य । साधा भक्तिभाग्य संत-संगें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

न पाहें गे माय विठईविण डोळां । सर्वस्वें कंटाळा आणिकांचा ॥१॥ विठोबाविण कांहीं नायकें मीं कानीं । जडली चरणीं चित्तवृत्ती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

न पाहे यातीकुळाचा प्रचार । धांवे सर्वेश्वर नामासाठीं ॥१॥ आपुलेंचि नाम आपण वाढवी । भक्तपणा मिरवी आपणची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न पुसतां संतां निघालाअ तेथुनी । पैलपार इंद्रायणी प्राप्त जाला ॥१॥ मागें पुढें पाहे पळत तांतडी । आला उठाउठी पंढरिसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

न फिटे हें ओझें मायेचा गुंडाळा । एका तूं गोपाळा शरण जाईं ॥१॥ तुटेल बिरडें सुटेल हा मोह । केशवींच भाव असों देणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

न बोलेची कांहीं इसीं काय झालें । भूतें झडपिलें निश्चयेंसी ॥१॥ माझिये अदृष्टीं नाहीं हा नंदन । ह्मणोनियां विघ्न ओढवलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

न मागों कांही तुम्हां धन वित्त संपत्ती । सोसुनी विपत्ती नाम गाऊं आवडी ॥१॥ न घेऊनियां भार जाणीव शहाणीव माथां । करुं तुमची कथा नित्यकाळ आवडी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

न माये चराचरीं त्रैलोक्य उदरीं । तो यशोदेचे कडेवरी शोभतो कैसा ॥१॥ गोपवेष मिसें ब्रह्माया लाविलें पिसें । तो गोपावत्सवेंषेम शोभतो कैसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न माये ध्यानीं योगिया चिंतनीं । नाचतो कीर्तनीं संतापुढें ॥१॥ डोळियाची धणी फिटलीं पारणीं । उभा तो सज्जनीं पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न ये मनासी अभागिया गोष्टी । म्हणे बोलती चावटी बहु बोल ॥१॥ सांगतां सांगतां बुडतसे डोहीं । पुढीलाची सोई नेणती ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ