भजनी मालिका
← भजनांकडे परत

न बोलेची कांहीं इसीं काय झालें । भूतें झडपिलें निश्चयेंसी

na bolechi kanhin isin kay jhalen | bhuten jhadapilen nishchayensi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न बोलेची कांहीं इसीं काय झालें । भूतें झडपिलें निश्चयेंसी ॥१॥ माझिये अदृष्टीं नाहीं हा नंदन । ह्मणोनियां विघ्न ओढवलें ॥२॥ निवारी हें दु:ख वैकुंठनायका । रक्षीं या बाळका सुदर्शनें ॥३॥ तुझा मी किंकर आजी अंबुजाक्षा । द्यावी मज भिक्षा हेंचि आतां ॥४॥ नामाचा उच्चार ऐकतांचि कानीं । नेत्र उघडोनि पाहती झाली ॥५॥ राजा म्हणे कांहो ऐसी हे अवस्था । कांहो भ्रम चित्ता झाला असे ॥६॥ विश्वाचा मी आत्मा स्वयें असें राम । मजमाजी भ्रम कैंचा असे ॥७॥ अवतार महिमा वाणी वेद माझा । सुरवरांच्या काजा नामा म्हणे ॥८॥