भजनी मालिका
← भजनांकडे परत

न पाहे यातीकुळाचा प्रचार । धांवे सर्वेश्वर नामासाठीं

na pahe yatikulacha prachar | dhanve sarveshvar namasathin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
न पाहे यातीकुळाचा प्रचार । धांवे सर्वेश्वर नामासाठीं ॥१॥ आपुलेंचि नाम आपण वाढवी । भक्तपणा मिरवी आपणची ॥२॥ स्वयें अवतार आपणाचि घेत । एका जनार्दनीं मात ऐका त्याची ॥३॥