भजनी मालिका
← भजनांकडे परत

न फिटे हें ओझें मायेचा गुंडाळा । एका तूं गोपाळा शरण जाईं

na phite hen ojhen mayecha gundala | eka tun gopala sharan jain

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न फिटे हें ओझें मायेचा गुंडाळा । एका तूं गोपाळा शरण जाईं ॥१॥ तुटेल बिरडें सुटेल हा मोह । केशवींच भाव असों देणें ॥२॥ कईंचे हे क्लेश उदासीन वांया । भजणें यादवराया हेंचि सत्य ॥३॥ नामा ह्मणे सुफळ भजनचि करीं । सर्वांभूतीं हरि भजनभावो ॥४॥