भजनी मालिका

भजने

धांव घाली विठु आतां चालुं नको मंद । मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥ विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला । शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

धांव रे धांव आतां । दीनवत्सला रामा । संसारसंग गोष्टी । मी गुंतलों कामा ॥१॥ तारुण्य अभिमानें । अंगा भरला ताठा । विषयसंपतीचा । मज फुटला फाटा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धांवण्या धांवतां न लावा उशीर । हा श्रेष्ठाचार मागें आला ॥१॥ गुणदोष नाहीं पाहिले कवणाचे । केलें बहुतांचे धांवणें देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धांवत धांवत जाईन वोरसे । दाटला उल्हासें कंठ माझा ॥१॥ अंतरींचें गुज सांगेन आपुलें । ह्लदयीं दाटले प्रेमअश्रु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धांवुनि जाईन श्रीमुख पाहीन । इडापिडा घेईन विठोबाची ॥१॥ तया सुखा दृष्टि लागेल वो झणीं । मग मी साजणी काय करूं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धांवुनीं तिजी गोपिका म्हणे वो बाई । येथें रहावया लाग उरला नाहीं ॥१॥ जात होतें पाण्यां यमुने पहाटीं । अविचित येऊनियां पाठी थापटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धांवू नको सैरा कर्माचियासाठीं । तेणें होय दृष्टी उफराटी ॥१॥ शुद्ध अशुद्धाच्या न पडे वेवादा । वाचे म्हणे सदा नारायण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धांवोनि मी येतो परि नेणें मारग । तूंचि लागवेग करीं आतां ॥१॥ अनाथ मी दीन रंक शरणांगत । म्हणूनियां त्वरित सांभाळावें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धांवोनियां नंदें धरिले चरण । घालूनि आसन बैस-विला ॥१॥ सुकुमार सांवळा राजीवलोचन । सुखी आहे कृष्ण मथु-रेंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धिक् तो आचार धिक् तो विचार । धिक् तो संसार धिक् जन्म ॥१॥ धिक् तें पठण धिक् तें पुराण । धिक् यज्ञ हवन केलें तेणें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा