भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवा धांवा नगरवासी। लास भक्षिते लेंकुरासी

dhanva dhanva nagaravasi| las bhakshite lenkurasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
धांवा धांवा नगरवासी। लास भक्षिते लेंकुरासी ।।१।। अवधे होऊनियां गोळा कोणी न जाती देउळा ||२|| बाळ करोनी पाहती । शेण धुळी धोंडे माती ।।३।। मारोनी बाहेर घातली केली डोंबाचे हवालीं ।।४।। हिच्या करा शिरच्छेदाला। तंव तो आज्ञापी रायाला ॥५॥ राय घेऊनियां तिला । आणियेलें ठिकाणाला ।।६।। म्हणे करीं हो स्मरण तुझें कुळदैवत कोण ।।७।। खड्ग पुसोनियां धारा घाव घाली जो शिरा ॥८॥ ऋषि धांवला सत्वरी वरच्यावरी कर धरी ।।९।। म्हणे माग मी प्रसन्न येरी बोले हास्यवदन ॥१०॥ रोहिदासा ऐसा पुत्र । हरिश्चंद्र राजा भ्रतार ।। ११ ।। याचक विश्वामित्रा ऐसा जन्मोजन्मीं दे जगदीशा ।। १२ ।। बापा भली केली सीमा तप वोपितों मी तुम्हां ।। १३ ।। गगनीं विमानें दाटतीं। सुमनभार वरुषती ।।१४।। वेगीं उतरलें विमान । नामयाची जनी म्हणे ।। १५ ।।