भजनी मालिका

भजने

तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥ तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुजसवे येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिल्या गिरी । चंग तई वांचलो ॥१॥ मोडा आतां खेळ । गाई गेल्या झाला वेळ । फाकल्या ओढाळ । नाहीं तेच आवरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥१॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥ हें चि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझा दास मी तों राहिलों होवोनि । बोल चक्रपाणि पुरे आतां ॥१॥ जावो प्राण आतां न सोडीन संग । नव्हति वाउगे बोल माझे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझा नामा तुज व्हावा जन्मोजन्मीं । काय यासी आम्ही करूं शकों ॥१॥ मर्यादाअ सांडोनि बोलसी कठिण । करिसी वायांविण इष्ट तुटी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविशी ॥१॥ बळें बांधोनियां देसी काळा हातीं । ऐसें काय चित्तीं आलें तुझ्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुझा म्हणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥१॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुझा म्हणवूनी दिसतों गा दिन । हाची अभिमान सरे तुझा ॥१॥ अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु॥ तैसा विठो तुजविन परदेशी । नको या दुःखासी गोवुं मज ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम