भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा दास मी तों राहिलों होवोनि । बोल चक्रपाणि पुरे आतां

tujha das mi ton rahilon hovoni | bol chakrapani pure atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझा दास मी तों राहिलों होवोनि । बोल चक्रपाणि पुरे आतां ॥१॥ जावो प्राण आतां न सोडीन संग । नव्हति वाउगे बोल माझे ॥२॥ श्रुति स्मृति वेद काव्यें ही पुराणें । तीं तुज भूषणें सुखें मानूं ॥३॥ काय हानि जाली सांगा मजपाशीं । उद्धारा जगासी नामा म्हणे ॥४॥