भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजसारिखा पंढरिनाथा । स्वामि शिरावरी असतां

tujasarikha pandharinatha | svami shiravari asatan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुजसारिखा पंढरिनाथा । स्वामि शिरावरी असतां ॥१॥ तरी मी आणिकांचा मागता । लाज कोणासी समर्था ॥२॥ असोनी क्षीरसिंधू जवळी । क्षुधाक्रांत तळमळी ॥३॥ कामधेनु तें वोळगतां । न पुरे कामना सर्वथा ॥४॥ विठा म्हणे नारायण । आतां शरण जाऊं कोणा ॥५॥