भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर

tujha das maj mhanati ankit | avaghe sakalik lahan thor

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥ हें चि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥ होउनी निर्भर राहिलों निंश्चितें । पावनपतित नाम तुझें ॥२॥ करितां तुज होय डोंगराची राई । न लागतां कांहीं पात्या पातें ॥३॥ तुका म्हणे तुज काय ते अशक्य । तारितां मशका मज दीना ॥४॥