भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकार उकार मकार निःशुन्य

akar ukar makar nihshunya

अकार उकार मकार निःशुन्य । साकार परे परता परे पंढरिये ॥१॥ ते रूप सावळे उभे कर कटी । पुंडलिका पाठी विटेवरी ॥२॥ भुवैकुंट क्षेत्र भिवरेचे तीरी । संत भारगजरी टाळघोळ ॥३॥ दिंड्या गरुडटेक पतकांचे भार । कीर्तन गजर वाळवंटी ॥४॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावता । जगमित्रादी तत्त्वता गाती नाम ॥५॥ मुक्ताई पूर्ण हरिपाठी रंगावली पूर्णपणे ॥६॥