भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे कान्हा अरे कृष्णा कमलावल्लभा

are kanha are krushna kamalavallabha

रचनाकार: संत बोधले · अभंग
अरे कान्हा अरे कृष्णा कमलावल्लभा । काय मी वर्णू तुझ्या रुपाची शोभा ॥१॥ पाहता तुझे रुप दिसे सर्वां ठायी । भावे भक्ती करोनी शरण आलो पायी ॥ २॥ आकळे तुझा महिमा न ब्रह्मादिका । साधु आणि संता नामे सापडसी एका ॥३॥ सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी । अनंत तीर्थे घडली राया तुझे ठायी ॥४॥ बोधला म्हणे चित्त राहो तुझे पायी । तुजविण सखा मज आणिक नाही ॥५॥