भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत जन्म घेतले याच देही

anant janma ghetale yach dehi

रचनाकार: संत बोधले · अभंग
अनंत जन्म घेतले याच देही । माझे स्वहित नव्हे कोठे काही ॥१॥ वेगी पावे पावे कृपानिधी । भवकर्म छेदी बा माझी आता ॥ २ ॥ संसारकर्मे बहुत भुललो । तुझे भजनी सावध नाही जालो ॥३॥ माया संसाराचा करिता भरोभरी । तुझा आठव नाही क्षणभरी ॥४॥ बोधला म्हणे तुज विनवितो देवा । काही घडो दे देही संतसेवा ॥५॥