भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासुदेव स्मरणें तुटती जन्ममरण व्याधी

vasudev smaranen tutati janmamaran vyadhi

वासुदेव स्मरणें तुटती जन्ममरण व्याधी। अहं सोहं कोहं मूळ ह्या सांडी उपाधी ।।१।। रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा। जन्म जरा तुटे वाचे आठवित सांठवा ।। धृ.।। चिपळ्या टाळ घुळघुळा शब्द नादे। तेणे ब्रह्मानंद हृदयीं आठवण नांदे ।।३।। एका जनार्दनी वासुदेव चिंतिता। यम काळ दूत पळती नाम ऐकता ।।४।।