भजनी मालिका
← भजनांकडे परत

घर्मार्थ काम मोक्ष देह प्राण

gharmartha kam moksha deh pran

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
घर्मार्थ काम मोक्ष देह प्राण । जीवीत वित्त घन अंतर बाह्मा ॥१॥ सकळही सत्य अर्पावें गुरुसी । व्हावें देहें दासी विकोनिया ॥२॥ अर्पावे श्रीगुरुठायी प्रेम अमर्याद । जीवें अर्पण बोधें ब्रह्मभावें ॥३॥ देहांदि मी माझें म्हणो नये कांही । भावावें सकळही अर्पण हें ॥४॥ महाल मुलुख भोग घनदारा पुत्र । मोक्षधर्म अर्थ श्रीगुरुतोचि ॥५॥ करोनय कांही चुकोनी वंचना । कलिया पतना होय नेमें ॥६॥ न्हे अनुमव अक्षय ते मुख । झालिया वंचक प्राप्त कही ॥७॥ करो नेय गुरु असो तसौ श्रेष्ठ । जरी नोहे भेटी दिवस फार ॥८॥ तयापसोनीया न घडे आत्मप्राप्ती । प्राप्तीवीण गती ठाके अंती ॥९॥ न वचे सांगतां योग एकवेळा । भेटे वेळोवेळां गुरु कराव तोचि ॥१०॥ आनंदाचा सागरु राजयोग एक । नसोचि आणिक ब्रह्माडीही ॥११॥ असती येर बहु योग प्राणायाम । शिको नये श्रम व्यर्थ तेथें ॥१२॥ न भेटेचि तेणें देहीं तो इश्वर । न हींय उद्धार ऐहिकही ॥१३॥ म्हणती भेटे देव राजयोगावीण । नाही त्या समान मुढ जगी ॥१४॥ एकचि तारक विश्वा राज योग । व्यर्थ लक्ष योग भ्रम सर्व ॥१५॥ म्हणे जनार्दन लाभे सांटी वाटी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१६॥