भजनी मालिका
← भजनांकडे परत

असती अभंग ताटीचे हे सोळा

asati abhang tatiche he sola

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
असती अभंग ताटीचे हे सोळा । दोन वर ताळा पुराणि केचे ॥१॥ ऐसें हे अठरा कैवल्याचे दीप । कामधेनु कल्पतरु जगीं ॥२॥ उदयलें जनार्दन वस्त्राकाशी । ब्रह्म तेजोराशी चिंतामणी ॥३॥ करावेम पठण नित्य हेचि भावें । तैसेंचि सेवावें सिदरुसी ॥४॥ गुरुसी शरण व्हावे नायकावी मात । माता पिता कांत असो कोणी ॥५॥ लाभावें अक्षय्य तेंचि ब्रह्मसुख । पाचावें ऐहिक परत्रही ॥६॥ निंदोत त्यागोंत स्त्रिया पुत्र सखे । ढळो नये सुखें त्यागावे ते ॥७॥ सेवावा सतत एकचि तारक । जन आशा दुःख नरक मुळ ॥८॥ सकळांसीं हेचि देवोनियां भाक । बोमातसो हांक मारोनिया ॥९॥ मुक्तेश्वर म्हणे पती बाप माय । श्रीगुरुचि वाय येर सर्व ॥१०॥