भजनी मालिका
← भजनांकडे परत

उबगले संसारा मजला

ubagale sansara majala

उबगले संसारा मजला । कोणी माहेरासी न्यावो । चुकवा एवढा जाच तुमच्या । पडते पाया वो ॥धृ॥ प्रपंच हा सासरा । मजला उगाची गांजितो । भेद भयंकर भाव । हा तर मजला । उगाचि जाळीतो ॥२॥ सासु ही कल्पना मजला । जाच करिते नाना । अविद्या ही तर ननंद । माझी उगीच राहीना ॥३॥ क्रोध माझा दीर मजला । भलतेचि बोलितो काम । माझा दादला मजला । भलती कडे नेतो ॥१४॥ आशा ममता जावा यानि। मांडियेली ना कुठवर । सोस जाच हा तर । कदापि राहवेना ॥५॥ जो माझे बाहेर दाखविल । त्यासी देह समर्पिन । म्हणे मुक्ताबाई गेली । माझी लज्जा उडान ॥६॥