भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचे तुम्हा जवळी असता

tumache tumha javali asata

रचनाकार: संत बोधले · अभंग
तुमचे तुम्हा जवळी असता । वाया सिणालका सर्वथ ॥१॥ हरि करुणानिधी मोठा । व्यापार टाका तुम्ही खोटा ॥२॥ सांडा प्रकृती स्वभाव । तुम्हासारिखाची देव ॥३॥ हरिस नाही बोल काही । वाया पडाल प्रवाही ॥४॥ जैसे प्रकृतीस्वभाव । त्यासी तैसाची देव ॥५॥ बोधला म्हणे पहा मनी । आणिक संतां विचारुनी ॥६॥