भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगुरुठायी सर्व अर्पोणि विश्वास

shriguruthayi sarva arponi vishvas

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
श्रीगुरुठायी सर्व अर्पोणि विश्वास । करावा अभ्यास गुरु निकट ॥१॥ मात्र जंव नाहीं विषयी अभिरुची । करावा तंवची अभ्यास हा ॥२॥ नव्हतां ऐसें तरी वीस पंचवीस । निकृष्ट ते तीस मर्यादा हे ॥३॥ केलियाहि साधे चाळीस तोंवरी । साधे मगही परी येवोनि जन्मा ॥४॥ सारोनिया आधीं साधनें संपुर्ण । रचावें सासन गुरुकृपें ॥५॥ नित्यनिशीं एकांती द्वादश वर्षे वरी । अद्वय श्रीहरी प्रगटेल ॥६॥ कोटी सुदर्शनें अनंत रवी दीप्ती । देही निर्वाळिती तेज प्रमा ॥७॥ अमित चंद्र सुर्य उन्मनीचे तेज । तुंचि तु सहज होशी तेणें ॥८॥ सुखाचा सागर आनंदाचा कंद । सर्वत्र गोविंद होशील तु ॥९॥ नसे या पर तें ब्रह्मांडी आणिक । निर्वाणिंचे सुख मोठें आहे ॥१०॥ घाले संत यांचि गुरुकृपा ज्ञानें । लामतां जें होणें आपेआप ॥११॥ देहीचा निजदेव लक्षाव प्रत्यक्ष । ज्ञान अपरोक्ष तें हें ऐसें ॥१२॥ ऐशा आत्मज्ञानें व्हावें ब्रह्मा । वर्णिती निगम शास्त्रें संत ॥१३॥ ज्ञानवीण कळा तेचि अवकळा । नलभे सोहळा ब्रह्मीची तो ॥१४॥ एक गुरुकृपाज्ञानचि तारक । नसेनि आणिक त्रिभुवनीं ॥१५॥ याचि लागीं तेहि गुरुसी शरण । प्रत्यक्ष राम कृष्ण हरि हर ॥१६॥ न करितां विचार शरण योगी यांसी । व्हावें कवणांसी पुसी नये ॥१७॥ होका मायाबाप गुरु देव पती । ऐकों नये येती आड जरी ॥१८॥ येती आड जाती नेमें तें पतनी । कुळेंसि अक्षय दोन्हीं बेचाळीस ॥१९॥ माता पिता पती जरी गुरु थोर । नाही अधिकार वर्जावया ॥२०॥ अथवा तयां मयें नव्हतां शरण । निश्चयें पतन घडे तयं ॥२१॥ यालागी रिघावें योगियां शरण । न लावितां क्षणः साधावें तें ॥२२॥ जरी नोहे साध्य पुर्ण जन्में याचि । गुरुदासां साधेचि जन्मोनिया ॥२३॥ वायां गेले ऐसें नाही आयकिल । शरण रिघाले योगीयाचे ॥२४॥ अनन्य जे भावें योगियांचे झाले । निश्चये उद्धरिले तेव्हांचि ते ॥२५॥ येर व्यर्थ कानी सांगती अक्षरु । म्हणतां तया गुरु महादोष ॥२६॥ तोचि गुरु नेत्रीं दावी देही देव । कृपा अनुभव साक्षात्कार ॥२७॥ म्हणे जनार्दन पहावा अंतर्द्दष्टी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥२८॥