भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन

saritecha ogh sagarin atala | videhi bhetala manaman

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन ॥ १ ॥ कवणाचे सांगातें पुसावया कवणातें । सांगतों ऐक तें तेथें कैचें ॥ २ ॥ नाहीं दिवस राती नाहीं कुळ याती । नाहीं माया भ्रांति अवघेची ॥ ३ ॥ म्हणे गोराकुंभार परियेसी नामदेवा सांपडला ठेवा विश्रांतीचा ॥ ४ ॥