भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडी कल्पना उपाधि

sandi kalpana upadhi

सांडी कल्पना उपाधि । तीच साधूला समाधि ॥ वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा घाला ॥ पुढे उमजेना काय । बुडत्याचे खोल पाय । एक मन चेष्टा करी । भूते बापुडी संसारी ॥ अवघी ईश्वराची करणी । काय तेथे केले कोणी । पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥