भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहज समाधी लागली निर्गुणी

sahaj samadhi lagali nirguni

सहज समाधी लागली निर्गुणी । खुंटलीसे वाणी न चले पुढे ॥१॥ खुंटला हा शब्द राहिला व्यवहार । झाला साक्षात्कार सदोदित ॥२॥ गळाली इंद्रिये राहिलेसे मन । झाले महाशून्य एका एकी ॥३॥ विरालीसे शक्ती झालीसे निवृत्ति । झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई ॥४॥ म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई । उपडी समाधी घेई जगा माजी ॥५॥