भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा

parabrahmin chitta nirantar dhanda

परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा । तथा नाहीं कदा गर्भवास ॥१॥ उपजोनी जनीं धन्य ते योनी । चित्त नारायण मुक्तलग ॥२॥ अव्यक्तीं पैं व्यक्ति चित्तासि अनुभव । सर्व सर्व देव भरला दिसे ॥३॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान उन्मनी विज्ञान । चित्त नारायण झालें त्याचें ॥४॥ आदि अंतीं हरि सर्व त्याचा जाला । परतोनि अबोला प्रपंचैसी ॥५॥ मुक्ताईचे निरंतर मुक्त । हरि सिंचित आम्हां घरीं ॥६॥