भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांचा सातांचा एका जागी मेळ

pancha satancha eka jagi mel

पांचा सातांचा एका जागी मेळ केवळ चांडाळ दुर्बुद्धि ते ॥१॥ जातांनाच माझी केली विटंबना | म्हणोनी नारायणा मागे आलो ॥२॥ पाहिला तयांचा मानस आदर जमा केला कर जाळावया ॥ त्यांच्या धाके मागे आलोरे अनंता । येत तुझ्या चित्ता बरे त्यांचे ॥४॥ नामा म्हणे जिवे आलो वाचवोनी । अजुनी तरी चक्रपाणी वांचवी मज ॥५॥