भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल यमुने पाबली । कृष्ण खेळे चेंडू फळी

pail yamune pabali | krushna khele chendu phali

रचनाकार: संत बोधले · अभंग
पैल यमुने पाबली । कृष्ण खेळे चेंडू फळी । खेळ खेळोनी वनमाळी । कवणा नातुडे ॥१॥ हा तव नाटक निराळा । कवणा न कळे याची लिळा । हा तव जाईन गोकुळा । कंसास करि रीस ॥ २॥ जाऊनी गोकुळा भितरी भुलवितो नरनारी । खुणा दावी नाना परी या गोपिकालागी ॥३॥ हा तव असोनि घरोघरी । बाळ लीला क्रीडा करी । दहीदूध करुनी चोरी। नवनीत भक्षीतसे ॥४॥ बोधला म्हणे कवतुक केले नव्हेत सुख दाविले । माझे मन तल्लिन जाले। कृष्णापायी पहावो ॥५॥