भजनी मालिका
← भजनांकडे परत

“पहिली माझी ओवी

“pahili majhi ovi

“पहिली माझी ओवी | प्रात:काळ होता गाईला | विधाता त्रिकूटीचा ॥१॥ त्रिकुटीचा देव | आचारक्रिया | शक्ती स्थूल | देही वर्तती । रक्तप्रभा ॥२॥ क्तप्रभा पृथ्वी | आउट हात जाण । आउट ताळ | गगन दीसताहे ॥३॥ दीसताहे लिंग गुरू | तो सूक्षम आंगुष्ठ | मात्र वर्ण । शुभ्र वर्ण ॥४॥ शुभ्रवर्ण आप | ज्ञानशक्ती पाहे । श्रद्धाहीन राहे । विष्णुभक्त ॥५॥ भक्तरुद्र तीसरा । सिवलिंग कारण । द्रव्यशक्ति स्थान । तेज तत्व ॥६॥ तेज तत्व पाही | महाकारण करतो ईश्वर | करतो सेवा त्याची ॥७॥ सेवात्याची घेतो । नीळकंठ ओंकार प्रमाण | मसूर दीसता हे ॥८॥ दीसताहे लिंग | अति गौरवर्ण वायोचे | स्फूरण तयातूनी ॥९॥ तयातूनी वाटे । पुण्याद्री पर्वत । भ्रमर गुंफानाथ | पाहावया ॥१०॥ पाहावया जावे । प्रसाद लिंगासी । विराट निवासी पीतवर्ण ॥११॥ पीतवर्णं पाही कैवल्यधारक | महत् शक्ति | देख त्याचे स्थळी ॥१२॥ त्याचे स्थळी | निवासी पीतवर्ण ॥१३॥ पीतवर्णं पाही | कैवल्यधारका महत् शक्ति | देख त्याचे स्थळी ॥१४॥ त्याचे स्थळी | उमा उक्षित बैसला । लक्षातीत जाला । अलक्ष तिथे ॥१५॥ दशदिशावेगळा नित्य निरंजन । निःशब्दी हे खूण | ओळखावी ॥१६॥ निवृत्तीप्रसादे बोले | मुक्ताबाई अनुभवचे | डोही स्थिरावली ॥१७॥